बुधवार, २७ जुलै, २०११

"तसे फार नाही..."

चालती पाऊले.........मन ते का तयार नाही
दुरावे तिच्या माझ्यातले..... तसे फार नाही

आठवणी असुनी चित्ती.. वाटे का आधार नाही
आसवांचे अबोली शब्द.. नयनी तसे फार नाही

हरवले क्षण मोरपंखी..इथे सुखाचा बाजार नाही
तुटक्या हृदयास माझ्या.... हवे तसे फार नाही

साद घालता आर्त ती... आता तू त्या पार नाही
मोजकेच होते शब्द ओठी मजकडे तसे फार नाही

मज मंजूर ना प्रारब्धा.. हा असा माझा सार नाही
भावना कळू दे तिला बाकी मागणे तसे फार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा