खातेवही प्रेमाची....
अजब कारभार आहे या प्रेमाचा
हिशोब करायला दिवस कमी पडतात
यात लाख मोलाचे असतात म्हणे क्षण सारे
एकएक क्षण गमावता आयुष्य भर रडतात
दोन हृदयाचा व्यवहार सरळ सरळ असतो
भावनांचा पैसा डोळे मिटून लावतात
यात भल्या भल्यानचे खाते गहाळ झाले
तरी मुद्दलीचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहतात
हिर-रांझा लैला-मजनू हे मोठे ठेवीदार होते
आदर्श उसना यांचा घेवून भागीदारी करतात
जमा खर्च जिंदगीचा मिळविता मिळत नाही
नाव डूबित ग्राहकाचे(तिचे)प्रेमाच्या खातेवहीत लिहितात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा