आभासाच्या त्या आभाळाला बघ सये
आठवणींची टाचणी लागली नकळत
साठवले होते जे भेटीचे मोती कधी मी
पापण्यांच्या शिंपल्यातून आले ओघळत
तिने मनावर केलेली सये
जखम खूप खोल होती ,
पण सहवासाच्या क्षणाची
तिनेच दिलेली ओलं होती
प्रेमपथावरंच माझ्या तुझंचं पाहिलं पाऊल,
तहानलेली धरती मी तुझ्या वर्षावाची चाहूल,
तग धरुदेत प्रेमांकुर कर मायेने त्याचं रक्षण,
चांदव्याची वात......करीलं उभं आभाळ हे औक्षण..!!
शब्द हि मुके झाले
भावना हि बोथड झाल्या ..!
लागले इतके चटके कि,
संवेदना हि सुन्न झाल्या..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा