बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

शहारलो मी बरसल्यावर

शहारलो मी बरसल्यावर
पाहुन तुझे ओले ते अंग
ढगांच्या धुसर राज्यातून
स्वप्न परीचाच तो मोहक संग

नाते आपुले वेगळे
सभोवताली ऊधळले होते
सृष्टिचे ते मोहक रंग
मात्र मी बरसण्यात अन तू
मला झेलण्यातच आपण दंग

म्हणायची कायम तू
बरस रे मेघा.. आता बरस तू
कर ओलेचिंब मजला
तुझ्याच मिठीत कर मज दंग

कवयत्रीच तू, मी काय बोलणार
बरसताना मात्र, ओलाव्यात मी
तुझ्या ओठांचाच वेध घेणार
ओलावा देवून त्यास मी हि चिंब होणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा