दोघांची एकदा भेट झाली
एकमेकांच्या तरूण सौंदर्याला भाळली
तिच्या नाजूकपणाची त्याला छाप पडली
त्याच्या धाडसीपणाला ती मोहरली
प्रेम समजून आकर्षणात गुंतली
संसाराच्या स्वप्नात रंगू लागली
विवाहाच्या पिंजर्यात अडकली
एक दोन वर्ष मौजमजेत गेली
तो बाबा अन ती आईही झाली
जबाबदार्यांची ओझी पडली
विचार्-मतामध्ये चिर पडू लागली
अवगुणांची आता छाप पडू लागली
कर्तव्याची उणीव भासू लागली
"माझेच खरे" ह्या शब्दाने उचल खाल्ली
एकमेकांची सोबत नकोशी झाली
घटस्पोटाची नोटीस दारात आली
त्याची तलवार बाळावर पडली
भितीची आसवे गालावर ओघळू लागली
माझे आई बाबा ही जाणिव त्यालाच राहीली
बाबा की आई आवडीची, निवड कोर्टाकडे गेली
आईची कुशी अन बाबांच्या खिश्याची निवड झाली
आई बाबांच्या प्रेमापासुन त्याची वाताहत झाली
आकर्षणाची जागा बाळाच्या कुपोषणाने घेतली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा