रोज वाटत निजताना
आज हि आकाशाला भिडणारी
छान छान स्वप्न पहावी
पूर्ण करण्याची जबाबदारी माझी
पण स्वप्न मात्र तुझ्या कुशीत दिसावी
मी अजूनही..
तुझ्या भेटीला आसुसलेला ..
तू आली नाहीस कि ...
प्रत्येक पापणीवर अश्रू तरळलेला ..
गर्दीत असूनही मी...
आता एकटा आहे...
तुझ्या आठवनिंनीच वेढलंय मला...
अन त्यात तूच फक्त आहेस...
आठवणींचा झुला...
गेला बघ आभाळा...
मला पुन्हा यायचं...
तुझ्या संगे झुलायला
कधी ओळखता नाही आले...
माझं मन तुझ्यातच गुंतलेले...
तू मात्र शोधात राहिलीस...
त्याला इकडे तिकडे..
तुझ्या साठी झालो होतो मी...
या जगाला अपरिचित...
तू सोडून दूर गेलीस..
अन पडलो होतो मी क्षणभर निपचित...
दर वेळी मी तुझी वाट,
पाहत थांबायचे ..
तू मात्र उशिरा येऊन...
तुझे हक्क लादायचे..
तुझी नजर चुकून बघताना...
मनात एक भीती होती...
पण तू पण मला पाहत असशील...
अशीच काही मनात नीती होती..
तू नटून थटून आलीस...
मनाचा माझ्या तर छेडल्यास...
रुंद तुझ्या कपाळावर...
माझ्या नावचा चंद्र कोरलास..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा